Dimple Publication

Sale!

पैस प्रतिभेचा मनमोकळ्या गप्पा प्रतिभा रानडे यांच्याशी, दीपली दातार Pais Pratibhecha, Deepali Datar

Original price was: ₹700.00.Current price is: ₹550.00.

Guarantee Safe & Secure Checkout

Language: मराठी                                                                                                                                                                                                                                                                        Author: Deepali Datar
Category: व्यक्तिचित्रण, अनुभव कथन
Publication: डिंपल पब्लिकेशन
Pages: 442
Weight: 540 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789392419904
Edition : Second

दुसरी आवृत्ती

मूल्य 700 सवलतीत 550

पोस्टेज् फ्री 

प्रतिभाताई आठवणी सांगतात तेव्हा वाटतं, ताईंच्या
हातांच्या दोन्ही मुठी सव्वालाखाहून अधिक अमूल्य किमतीच्या
ऐवजाने भरभरून वाहत आहेत. एका मुठीत त्यांचं वैयक्तिक
भावजीवन तर दुसऱ्या मुठीत त्यांचं कल्पनाविश्व आणि
विचारविश्व. दोन्ही मुठींतल्या ऐवजांची सांगड घालत वाटचाल
करणाऱ्या ताईंना ‘जन्म’, ‘मृत्यू’, ‘पुनर्जन्म’ या गूढांना जाणून
घेण्याची प्रचंड ओढ आहे. मृत्यूचा अनुभव घ्यावा असं वाटत
असतानाच एकदा मेल्यावर तो अनुभव आठवणार कसा हा प्रश्न
त्यांना अस्वस्थ करतो. मग त्या बुद्धादी महामानवांचे, ज्ञानेश्वरादी
संतमहात्म्यांचे, जागतिक राजकारणात प्रभावशाली ठरलेल्या
नेत्यांचे, तत्त्वज्ञांचे जन्म, मृत्यू, त्यांचं एकाकीपण आणि
सामान्यपण शोधत जातात.
प्रतिभाताईंच्या कल्पनाविश्वाला भविष्याचा वेध घेण्याची
आस तर आहेच; तथापि सतत प्रगतिपथावर असणाऱ्या
विज्ञानयुगातल्या माणसाचं पुढे काय होणार याची उत्सुकता
आणि काळजीही आहे. त्यांच्या विचारविश्वात विचारवंत,
सुधारक, शास्त्रज्ञ, पराक्रमी स्त्रिया, विद्वान स्त्रिया, पिचलेली,
नियतीला शरण जाणारी माणसं, धर्म, संस्कृती, कला, निसर्ग हे
सगळं आणि त्याशिवाय अजूनही बरंच काही शतपावली घालत
असतं. म्हणूनच ताईंशी गप्पा मारणं हा एक श्रीमंत करणारा
अनुभव असतो.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पैस प्रतिभेचा मनमोकळ्या गप्पा प्रतिभा रानडे यांच्याशी, दीपली दातार Pais Pratibhecha, Deepali Datar”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top