Language: मराठी
लेखक: मेघना साने
Category: कथासंग्रह
Publication: डिंपल पब्लिकेशन
Pages: 164
Weight: 210 Gm
Binding: Paperback
Edition : First
मूल्य 300
पोस्टेज् फ्री*
युगानुयुगे चाललेला स्त्री जीवनाचा प्रवास पाहिला तर लक्षात येतं की स्त्रीमध्ये सतत बदल होत आहेत. ते सर्वांगांनी होत आहेत. स्त्री- पुरुष नात्यांमध्ये स्त्रीच्या पुरुषाकडून असलेल्या अपेक्षाही बदलत आहेत. तिला आता आत्मसन्मानाची जाणीव झालेली आहे. आपल्याला माणूस म्हणून आपल्या कलागुणांसह सन्मानाने वागवणारा सहचर तिला हवा आहे. ‘तिला काय हवंय हे त्याला कधीच कळत नाही.’ हे मेघनाताईंचं मनोगतातील वाक्य मोठं मार्मिक आहे. खरंच स्त्री- – पुरुष हे विवाहानंतर वर्षानुवर्षे एकत्र राहिले तरी स्त्रीच्या मनाचा ठाव त्याला लागत नाही. तिच्या त्याच्याकडून काय अपेक्षा असतात हे ती क्वचितच बोलून दाखवते. त्यानं ते स्वतःहून ओळखावं असं मनातून तिला वाटत असतं. मेघनाताईंच्या कथेतील सर्वच नायिका या आजच्या काळातील आहेत. कथांमधील समस्याही आजच्या काळातल्या आहेत. मला वाटते, सध्याच्या युगात नात्यांमधील सकारात्मकता दाखवणे किंवा नाती टिकवण्यासाठी प्रयत्न करणे जरुरीचे आहे. या सर्व कथांनी नात्यांची वीण घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आई आणि लेक, दोन बहिणी, दोन मैत्रिणी, नवरा-बायको, सासू-सून, बाप आणि मुलगी, कॉलेजमधील मित्र अशा सर्वांचा सुसंवाद घडून यावा ही लेखिकेची इच्छा दिसते.
– डॉ. निशिगंधा वाड









Reviews
There are no reviews yet.