Language: मराठी
Author: दीपाली केळकर
Category: माहितीपर
Publication: डिंपल पब्लिकेशन
Pages: 222 + 12 पाने कलर
Weight: 345 Gm
Binding: Paperback
तिसरी आवृत्ती
मूल्य 400
पोस्टेज् फ्री
आजच्या डिजिटल युगात मुलांचे खेळ बदलले आहेत. भातुकलीही नव्या
अवतारात टिकून आहे. पण त्यात आलेली स्थित्यंतरं जर तुम्हाला
पाहायची असतील तर करंदीकर काकांच्या भातुकलीला पर्याय नाही.
– प्रा. डॉ. मोहसिना मुकादम
या पुस्तकाच्या निमित्तानं दीपाली केळकर यांनी भातुकलीचे एकमेव
संग्राहक असलेल्या पुण्यातील श्री. विलास करंदीकर या एका छंदोग्याला
बोलतं केलं. संस्कृती संवर्धनाच्या कालप्रवाहात करंदीकर यांचं हे योगदान
फार मोलाचं आहे. याशिवाय अनेक मान्यवरांनीही आपापलं बालपण या
पुस्तकाच्या निमित्तानं रेखाटलं आहे. या सगळ्यामुळंच या अभिनव
पुस्तकाचं मोल आणखीनच वाढलं आहे. – डॉ. सागर देशपांडे
नाट्यकलेचा उगम भातुकलीत आहे असं मला वाटतं. आपल्याला नाटक
आवडतं म्हणजे काय? किंवा बिंब-प्रतिबिंब भाव म्हणजे काय? तर
आपल्याच जीवनाचं प्रतिबिंब पडद्यावर किंवा रंगमंचावर आपण बघतो आणि
त्यात रमून जातो. भातुकलीत अनुकरण आहे, निरीक्षण आहे. तसंच
कल्पनाशक्ती, सर्जनशीलता आहे. जो भातुकली छान खेळतो ना, तो पुढे
जाऊन कलाक्षेत्रात उत्तम काम करू शकतो असं माझं निरीक्षण आहे.
भातुकली खेळाचं वैशिष्ट्य म्हणजे भातुकली खेळायला शिकवायला लागत
नाही. ती अंगभूतच असते आपल्यात.
– डॉ. माधवी वैद्य








Reviews
There are no reviews yet.