Overview
Language: मराठी
मूळ लेखक : जोगिंदर पॉल अनुवाद : प्रतिभा रानडे
Category: ललित लेख
Publication: डिंपल पब्लिकेशन
Pages: 112
Weight: 200 Gm
Binding: Paperback
मूल्य 170
पोस्टेज् फ्री *
प्रतिभा रानडे यांच्या लेखणीतून उतरलेला जोगिंदर
पॉल यांच्या उर्दू ‘ख्वाबरू’ आणि इंग्रजी ‘Sleepwalkers’ या
लघुकादंबरीचा ‘स्वप्नशिल्प’ हा सशक्त अनुवाद. हिंदुस्तानच्या
फाळणीनंतर भारतातील कित्येक मुस्लीम पाकिस्तानात निघून
गेले होते, त्यांना अजूनही मुहाजिर-निर्वासितच समजले जाते,
त्या संबंधातील ही कादंबरी.
यांतील प्रत्येक व्यक्तिरेखा ही एकेका वृत्ती-प्रवृत्तीचं
प्रतीक आहे. त्यामध्ये वैविध्य असलं तरी त्या सगळ्या व्यक्ती
‘पाकिस्तान म्हणजे काय’, ‘फाळणी की स्वातंत्र्य’ या प्रश्नांच्या
उत्तराचा शोध आपापल्या परीने घेत आहेत. कादंबरीतील मुख्य
पात्र ‘दीवाने मौलवी साहेब’ मात्र या सगळ्यांपासून कोसो दूर
आहेत. ते अजूनही पाकिस्तानची मागणी करण्यातच रमले
आहेत; पण अखेरीस त्यांच्या या कल्पनेच्या राज्याचा ठिकऱ्या-
ठिकऱ्या उडतात, तेव्हा त्यांना ‘पाकिस्तान म्हणजे काय’, ह्याची
खरी जाणीव होते. मग ते दुसऱ्या कल्पनेच्या राज्यात विहार करू
लागतात. मनात विषण्णतेबरोबरच करुणेची भावना जागी
करणारी, वेगळ्या दुःखाचं आणि
रंजक अशी ही कादंबरी!



Average customer rating
There are no reviews yet.