&

कपाळकोंदण

0 Ratings

Language: मराठी Author: निशा डांगे Category: कथासंग्रह Publication: डिंपल पब्लिकेशन Pages: 186 Weight: 250 Gm Binding: Paperback ISBN13: 978-81-972848-7-8 विशुद्ध कल्पनेच्या पातळीवर प्रखर सत्यामधील सौंदर्याचा प्रत्यय देणे, हे ‘ललित गद्याचे’ मर्म आहे. म्हणजेच सौंदर्यपूर्ण निरागस; पण किमया असलेली अभिव्यक्ती, त्यास ‘ललित’ म्हटले जाते. म्हणून कल्पनेच्या पातळीवर असलेल्या सत्यान्वेषी सौंदर्यपूर्ण शाब्दिक अभिव्यक्तीला ‘ललित गद्य’ अशी संज्ञा

Add to BookShelf

Overview

Language: मराठी
Author: निशा डांगे
Category: कथासंग्रह
Publication: डिंपल पब्लिकेशन
Pages: 186
Weight: 250 Gm
Binding: Paperback
ISBN13: 978-81-972848-7-8

विशुद्ध कल्पनेच्या पातळीवर प्रखर सत्यामधील सौंदर्याचा प्रत्यय देणे, हे ‘ललित गद्याचे’ मर्म आहे.

म्हणजेच सौंदर्यपूर्ण निरागस; पण किमया असलेली अभिव्यक्ती, त्यास ‘ललित’ म्हटले जाते. म्हणून कल्पनेच्या पातळीवर असलेल्या सत्यान्वेषी सौंदर्यपूर्ण शाब्दिक अभिव्यक्तीला ‘ललित गद्य’ अशी संज्ञा आहे. ही ललित गद्याची लक्षणे निशा डांगे यांच्या ‘कपाळगोंदण’ या ललितलेख संग्रहात जागोजागी दृष्टोत्पत्तीस पडतात.

या सर्व आरस्पानी ललितलेखांत चिंतन आहे; पण त्याचे जडत्व नाही. ‘अंतरीचे धावे। स्वभावे बाहेरी।।’ या तुकोबांच्या उक्तीचा परीसस्पर्श निशा डांगे यांच्या ललित गद्याला लाभला आहे. निसर्गाचे सर्ग नि चिंतनाचे गर्भ यांचे अनोखे संयुग सहजतेने त्यांनी आपल्या शब्दसारिणीत साकारले आहे..!

सरस आणि सुरस, प्रसन्न आणि प्रच्छन्न, युज आणि सायुज्ज, रत आणि अविरत स्त्री-मनगुह्य संवेदनांचा प्रवास म्हणजे ‘कपाळगोंदण’ हे ललितसार ठरावे.

निशा डांगे यांच्या पुढील ललित कोंदणाला मी सर्व साहित्यकुलातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो..!!

– प्रा. अशोक बागवे

BOOK DETAILS
  • Hardcover:
  • Publisher:
  • Language: ,
  • ISBN-10:
  • Dimensions:
Customer Reviews

Average customer rating

0 Ratings
Be the first to review “कपाळकोंदण”

Your email address will not be published. Required fields are marked *

There are no reviews yet.

BOOKS BY &

SHARE THIS BOOK