-
Originally Published:
-
Hardcover:
-
Language:,
Overview
संकल्पना : मंजिरी अमेय हेटे, प्रसाद महाडकर
आशा भोसले
माझी आशाची पहिली ओळख झाली तेव्हा तिची छबी ही साधे पाचवारी पातळ, पोलके, कपाळावर कुंकवाचा मोठा टिळा, गच्च केसांच्या दोन वेण्या आणि हातात खूपशा सोन्याच्या बांगड्या घालणारी स्त्री अशी होती; जी मनमोकळ्या, लाघवी व थट्टेखोर स्वभावाची होती. ‘जिवलगा, राहिले रे दूर घर माझे’
हे मी लिहिलेले गाणे आशाने गायले आहे; त्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी तिने काठावर फाटलेली पांढरी रेशमी साडी घातली होती. त्या फाटलेल्या साडीला मी सुई दोऱ्याने चार टाके घातले होते.
फाटकी साडी केवळ लकी आहे म्हणून नेसणारी आशा ही अशी जरा मनःस्वी आहे. आशाचे तिच्या सर्व भावंडांवर प्रेम आहे व त्याचीच प्रचिती लता दीदींवर तिने लिहिलेल्या ‘आमचे छोटे दादा’ यामध्ये आली आहे, पण जिभेने ती जरा तिखट आहे. आशाला वाचनाची देखील विलक्षण आवड आहे.
थोडक्यात काय तर मंगेशकरांच्या सोन्यासारख्या कलासंपन्नते बरोबरच या घराचे साधे निर्मळपणही आशाच्या रक्तात पुरेपूर भिनलेले आहे. स्वकष्टाने, जिद्दीने, धैर्याने आणि कलेच्या
अखंड साधनेने आशाने चित्रपटसृष्टीमध्ये
आजचे हे मानाचे स्थान मिळविले आहे.
– शांता शेळके
Average customer rating
There are no reviews yet.