-
Genre:Uncategorized, कथासंग्रह
-
Originally Published:
-
Hardcover:
-
Language:,
Overview
Language: मराठी लेखक: रामदास खरे Category: गूढकथासंग्रह Publication: डिंपल पब्लिकेशन Pages: 104 Weight: 210 Gm Binding: Paperback Edition : First मूल्य 200 पोस्टेज् फ्री*
गूढकथा हा साहित्यप्रकार मोजक्याच लेखकांनी
जाणीवपूर्वक हाताळलेला आहे. तो समजून घ्यायचा तर त्याचं
भयकथा, वा रहस्यकथांपेक्षा वेगळा असणं आधी लक्षात
घ्यायला हवं. गूढ हे केवळ अतींद्रिय स्वरुपाचं, दहशत
दाखवणारं असत नाही, तर ते आपल्या आयुष्याशी
जोडलेलंही असू शकतं. कोणतीही गोष्ट तर्काच्या पलीकडील
भासण्यातून, तिच्या अनाकलनीय असण्यातून ते आकार घेत
असतं, आणि आपल्याला कोड्यात पाडत असतं. आपली
एखादी कृती, एखाद्या नात्यामागचे गुंतागुंतीचे अर्थ, आपण
गृहीत धरत असलेल्या प्रेम वा द्वेष यासारख्या मूलभूत
भावनांचं उगमस्थान, अशा कोणत्याही घटकात गूढता
सामावून राहिलेली असू शकते. रामदास खरे अशा घटकांचा
शोध या कथासंग्रहातून घेताना दिसतात.
अपवाद वगळता खरेंच्या बहुतेक कथांची पार्श्वभूमी
परिचित वळणाची आहे. वास्तववादी पद्धतीची. या
व्यक्तिरेखा आपण आपल्या अवतीभवती पाहिलेल्या आहेत.
पण कथेच्या ओघात या व्यक्तीरेखांच्या आयुष्यात उभे रहाणारे
पेच, त्यांना ठराविक साच्यातून बाहेर काढतात. त्यांच्याकडे
पाहण्याचा एक नवा, अनपेक्षित पैलू आपल्यापुढे ठेवतात, जो
कथांमधला गूढतेचा धागा अधोरेखित करतो.
– गणेश मतकरी



Average customer rating
There are no reviews yet.