Overview
Language: मराठी Author: कुमार केतकर Category: लेख Publication: डिंपल पब्लिकेशन Pages: 205 Weight: 330 Gm Binding: Paperback Edition : Revised Edition मूल्य 350 पोस्टेज् फ्री*
राजकारण! प्रत्येक सामान्य माणसाच्या आयुष्याला वेढून राहिलेला विषय.
राजकारणाशिवाय सामाजिक जीवन असूच शकत नाही. मग कोणला त्यात
रुची असो अथवा नसो. प्रत्येकाचे राजकीय मत हे असतेच. लोकांची ही मते
स्वानुभवावरून, टीव्हीवरील बातम्यांवरून, वृत्तपत्रातील लेख-
अग्रलेखांवरून बनत असतात. इतर कोणत्याही माध्यमापेक्षा वृत्तपत्रातील
लेख-अग्रलेखांमधून तत्कालीन राजकीय घटनांचे विस्तृत विश्लेषण केले
जाते. या लेखांमधून राजकीय व्यक्तींचे शह-प्रतिशह, डावपेच यांचे दर्शन
तसेच राजकीय घटनांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय परिणामांबद्दलच्या
परखड विचारांचे प्रकटीकरण होत असते. राजकीय घटनांचा, व्यक्तींचा शोध
म्हणजे आपल्या सामाजिकतेचा शोध. वृत्तीप्रवृत्तींचा शोध. असा शोध घेणारे
हे काही राजकीय विषयांवरील, व्यक्तींवरील विचारप्रवर्तक लेख. काही
लेखांना तत्कालीन परिस्थितीचे संदर्भ आहेत. काही लेखातून राजकीय
धुळवडीचे विषण्ण करणारे चित्रण आहे. तर काही लेखांतून मोनालिसाच्या
स्मिताप्रमाणे गूढतेचे धुके दाट झाले आहे. आजकालच्या पुढच्या
पायरीवरून या घटनांकडे, व्यक्तींकडे पाहताना या लेखांमधील विचारमंथन
वाचकांना अंतर्मुख करेल.
– कुमार केतकर



Average customer rating
There are no reviews yet.