-
Genre:Uncategorized, ललित, लेख
-
Originally Published:
-
Hardcover:
-
Language:,
Overview
Language: मराठी Author: कुमार केतकर Category: लेख Publication: डिंपल पब्लिकेशन Pages: 268 Weight: 400 Gm Binding: Paperback Edition : First Edition मूल्य 450 पोस्टेज् फ्री*
विसावे शतक जरा लांबलेच. त्या शतकाच्या सुरुवातीलाच, १९०३
साली, राईट बंधूंनी पहिल्यावहिल्या विमानाचे उड्डाण केले आणि १९०५
साली अल्बर्ट आईन्स्टाईनने त्याचा सापेक्षतावादाचा क्रांतिकारक सिद्धांत
मांडला. म्हणजे तसे पाहिले तर विज्ञान-तंत्रज्ञान माणसाला भविष्यात
झेपावून नेत होते; पण त्याच वेळेस इतिहास-भूगोलाच्या पायात
अडकलेल्या शृंखला त्याला खाली खेचत होत्या. त्याच सुमाराला, म्हणजे
१९०५ साली लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करून १९४७च्या
फाळणीच्या थरारक नाट्याची नांदी सादर केली होती. त्याच वर्षी म्हणजे
१९०५ सालीच रशियात पहिली लोकशाही क्रांती झाली आणि १९१७ च्या
कामगार क्रांतीसाठी त्या महानाट्याचा पडदा वर गेला.
***
एकविसाव्या शतकातील पहिल्या दशकाने हे आतापर्यंत स्पष्ट केले
आहे की, कोणताही देश, कोणतीही विचारसरणी, कोणतीही व्यक्ती,
कोणताही धर्म वा कोणतीही संस्था/संघटना आताच्या जगाला दिशा देऊ
शकत नाही, नियमन वा नियंत्रण करू शकत नाही, इतकेच काय
आदर्शही देऊ शकत नाही. स्पर्धा, संशय आणि संघर्ष यांनी बहुसंख्य
लोकांना वेढलेले आहे आणि राष्ट्र-राज्य ही संकल्पना आता मानवी
संस्कृतीच्या विकासाच्या टप्प्यातील अडथळा ठरू लागली आहे.
– कुमार केतकर



Average customer rating
There are no reviews yet.