&

ओम मणि पद्मे हुं; वैभव सोनारकर; Om Mani Padme Hun, Vaibhao Sonarkar

0 Ratings

Language: मराठी                                                                                                           

Add to BookShelf

Overview

Language: मराठी                                                                                                                                                                                      
लेखक : वैभव सोनारकर
Category: कवितासंग्रह
Publication: डिंपल पब्लिकेशन
Pages: 100
Weight: 180 Gm
Binding: Paperback
Edition : Second

मूल्य 160

पोस्टेज् फ्री*

ब्लूप्रिंट' (२००४), ‘काषाय अक्षरे' (२०१४) हे माझे दोन कवितासंग्रह डिंपल पब्लिकेशनतर्फे प्रसिद्ध झालेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त १२५ कवींच्या 'दि इन्फिनिट बाबासाहेब' या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे संपादनही डिंपल पब्लिकेशनतर्फे प्रसिद्ध झाले. आता 'ओम मणि पद्मे हुं' हा डिंपल पब्लिकेशनतर्फे प्रसिद्ध होणारा माझा तिसरा काव्यसंग्रह वाचकांसमोर सादर करतांना विशेष आनंद होत आहे. 'ब्लूप्रिंट' या माझ्या पहिल्या काव्यसंग्रहाला बाबासाहेब डॉ. आंबेडकरांच्या क्रांतिदर्शी विचारांचा आधार होता. तर 'काषाय अक्षरे' या दुसऱ्या काव्यसंग्रहातून बुद्धविचारांचा प्रकाश कवितेतून परावर्तीत झाला आहे. आता 'ओम मणि पद्मे हुँ' या माझ्या तिसऱ्या काव्यसंग्रहातील कविता या तथागतांच्या देशनेतून एका कविच्या चित्तात झालेल्या परिवर्तनाचे काव्यप्रतीक आहेत. माणसाला अधिकाधिक माणूस करणाऱ्या तथागतांच्या देसणेचे मूलद्रव्ये 'ओम मणि पद्मे हुं' मधील कवितांतून प्रवाहित झाली आहेत. 'बुद्ध' हे कोणालाही आपल्याकडे आकर्षित करणारं व्यक्तित्व. या व्यक्तित्वाचा सहवास आपणच आपल्याला श्रीमंत करणारा असतो. या व्यक्तित्वाचा सहवास आपणच आपल्याला सुगंधित करणारा असतो. या व्यक्तित्वाचा सहवास आपणच आपल्याला प्रकाशमान करणारा असतो. जीवनातलं दुःख, त्या दुःखाचा आवेग यांनी मानवी जीवन वेढलेलं असतं. या दुःखातून मुक्त, अलिप्त होण्याचा मार्ग आपल्याला बुद्धांच्या देसनेतून गवसतो. या बुद्धदेसनेतून जीवनाकडे, सृष्टीकडे, दुःखाकडे, सुखाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी प्राप्त होते. या दृष्टीने आपणच आपल्याला नव्याने भेटत जातो. आपल्यातील अनेक दोष, तृष्णा, अनिष्ट आकांक्षा, अपेक्षा, अहंकार वितळत जातात. आपण प्रवाही आणि स्वच्छ होत जातो. नव्याने कित्येकदा जन्म घेतो. कित्येकदा पुन्हा उगवून येतो. या साऱ्या स्थित्यंतराचा प्रत्यय या काव्यसंग्रहातील कविता आहेत.
BOOK DETAILS
  • Hardcover:
  • Publisher:
  • Language: ,
  • ISBN-10:
  • Dimensions:
Customer Reviews

Average customer rating

0 Ratings
Be the first to review “ओम मणि पद्मे हुं; वैभव सोनारकर; Om Mani Padme Hun, Vaibhao Sonarkar”

Your email address will not be published. Required fields are marked *

There are no reviews yet.

BOOKS BY &

SHARE THIS BOOK