-
Genre:आत्मकथन, आत्मचरित्र
-
Originally Published:
-
Hardcover:
-
Language:,
Overview
Language: मराठी आत्मकथन : अनिल सावंत शब्दांकन : राजीव पाटील Category: आत्मचरित्र Publication: डिंपल पब्लिकेशन Pages: 464 + 4 कलर पेजेस् Weight: 560 Gm Binding: Hard Bound Edition : First Edition मूल्य 800 पोस्टेज् फ्री*
धाडसी स्वभाव, निष्पक्ष वृत्ती, डोळ्याला डोळा भिडवून कुठल्याही आव्हानाला सामोरं जाण्याची सवय आणि आपल्या कर्तव्या प्रती असलेली वचनबद्धता कायम जोपासणारा एक सक्षम मानव संसाधन अधिकारी अशीच तुमची ओळख आहे. फोर्ब्स कॅम्पबेल, आय.व्ही.पी.लिमिटेड, सियाट टायर्स, ब्ल्यू स्टार, डी.एच.एल. सर्ल इंडिया – आर.पी.जी. लाईफ सायन्सेस, वोक्हार्ट, दीपक फर्टिलायझर्स अशा कितीतरी दिग्गज कंपन्यांमध्ये मानव संसाधन विभागात उच्चपद भूषविताना तुम्ही स्वतःची ओळख; अत्यंत आक्रमक पण तळागाळातल्या कर्मचाऱ्यांचा जाणता व्यवस्थापक अशी निर्माण केलीत.
तुम्ही नेहमीच कंपनीचं व्यवस्थापन आणि तिथले कर्मचारी यांच्या मध्ये असलेलं अंतर तटस्थपणे भरून काढणाऱ्या मध्यस्थाची भूमिका निभावलीत आणि प्रत्येक वेळी; वैयक्तिक हिताची चिंता न करता ‘चुकीला … चूक’ म्हणायला तुम्ही कधीही कचरला नाहीत. एक कसलेला मुष्टियोद्धा (बॉक्सर), गायक, नाट्य अभिनेता आणि स्पर्धात्मक पातळीवर कुशल वाहन चालक असे चतुरस व्यक्तिमत्व लाभलेल्या तुमच्यासारख्या धुरंधराचा हा जिवनप्रवास म्हणजे; व्यावसायिक आहे.
कार्यसंस्कृती आणि मानवी जीवन यांची सांगड घालणारं विशुद्ध तत्त्वज्ञान तुमच्याबरोबर काम करणाऱ्या भाग्यवंतांपर्यंत जसे तुमचे प्रामाणिक विचार पोहोचले त्याचप्रमाणे या पुस्तकाद्वारे तुमची अभिव्यक्ती हजारो लोकांपर्यंत पोहोचावी हीच शुभेच्छा.
– राजीव पाटील



Average customer rating
There are no reviews yet.