Dimple Publication

काषाय अक्षरे, वैभव सोनारकर; Kashay Akshare, Vaibhao Sonarkar

160.00

Guarantee Safe & Secure Checkout

Language: मराठी                                                                                                                                                                                      
लेखक: वैभव सोनारकर
Category: कवितासंग्रह
Publication: डिंपल पब्लिकेशन
Pages: 100
Weight: 220 Gm
Binding: Paperback
Edition : Second

मूल्य 160

पोस्टेज् फ्री*

चांगली मराठी कविता हे बिरुद दलित कवितेच्या सामर्थ्यामुळे सार्वत्रिक झाले. पुढे दलित कविता हे नामकरण मराठी कवितेत लुप्त झाले. त्यामुळे आक्रस्ताळेपणा, विद्रोह ह्या गोष्टींना बंधन आले. कवितेचा तत्त्वज्ञानात्मक रस्ता ह्यातूनच समोर आला. उत्तर-आधुनिक नाशपर्वामुळे ह्या रस्त्याकडे खूप कमी अशी मराठी कविता पोचली. तिथेच थांबली. अनेक नव्याजुन्या कवींनी ह्या रस्त्यावरून जाण्याचे नाकारून आपली पायवाट चालण्याचा प्रयत्न चालू ठेवला. वैभव सोनारकर हे ह्यापैकीच एक कवी. मी अजून लिहितो आहे, शब्दांमध्ये बुद्ध भरून अशी त्यांच्या कवितेची वेगळी सुरुवात होती. ‘काषाय अक्षरे’ ह्या त्यांच्या नवीन कवितासंग्रहात ते थोडे पुढे सरकल्यासारखे दिसतात. धर्मसंस्थापक बुद्ध की तत्त्वज्ञानी बुद्ध? ह्या दोन पर्यायापैकी ते आपल्या कवितेत दुसरा पर्याय थेट स्वीकारताना दिसतात. त्यांचे विचार ह्याच एका भूमिकेमुळे काषाय युगापर्यंत पोहोचलेत. आयुष्याचा अजिंठा, देहाची काषाय बासरी, सर्वस्वी काषाय अशी शीर्षके जरी पाहिली तरी त्यांच्या कवितेचा पोत ध्यानात येतो. अशा कवितेची गरज ऐंशीच्या दशकात अस्तित्वात यायला पाहिजे होती. असे झाले असते तर सांस्कृतिक अतिक्रमणाचा परतावा आपल्याला थेटपणे करता आला असता. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात सांस्कृतिक अवकाशात बुद्ध तत्त्वज्ञान उभे राहणे ही अस्सल भारतीयत्वाची खूण बनली आहे आणि ह्या तत्त्वज्ञानाचा वर्तमानकालीन उपयुक्ततेचा मार्ग थेट कवितेतून जातो. सोनारकर ह्यांचा ‘काषाय अक्षरे’ हा नवा कवितासंग्रह ह्याच नजरेने बघायला हवा. त्यातील गेयपणा सांस्कृतिक अवकाशात उभे राहण्यासाठी ऊर्जा पुरवेल, असे म्हणायला खूप जागा आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “काषाय अक्षरे, वैभव सोनारकर; Kashay Akshare, Vaibhao Sonarkar”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top