Language: मराठी Author: विवेक पंडित
Edition : दुसरी आवृत्ती Category: कथासंग्रह Publication: डिंपल पब्लिकेशन
Pages: 248 + 8 कलर पेजेस्
Weight: 306 Gm
Binding: Paperback
कातकरी ही विशेष असुरक्षित श्रेणीतील आदिम आदिवासी जमात आहे. उत्क्रांतीच्या हजारो वर्षांपूर्वीच्या टप्प्यावर त्यांचा विकास गोठून राहिलेला आहे. ते डोंगर-कपारीत राहत नाहीत. महानगरांच्या जवळ उघड्यावर पडल्यासारखे जगतात. कंत्राटदारांचा, कोळसाभट्टी, वीटभट्टी मालकांचा त्यांच्यावर डोळा असतो. काही हजार रुपयांच्या बयाण्यावर ते त्यांना ढोरमेहनतीसाठी बांधून घेतात, आणि कुठे कुठे कामाला घेऊन जातात. अति श्रमांची कामे ते करतात. त्यातून वेदना शमविण्यासाठी व्यसनाधीन होतात. आदिम संस्कृतीमुळे उद्याच्या भविष्याचा विचार ते करू शकत नाहीत. कायम कर्जबाजारी, आणि मग ते फेडण्यासाठी मुकाट गुलामांचे जिणे जगतात. सर्व तऱ्हाच्या शोषणाला बळी पडतात. दारिद्र्य, भूक, निरक्षरता, सरकारदरबारी अस्तित्वच नसणे, अशा परिस्थितीत आयुष्याशी लढायला त्यांच्या हातात काहीच नाही. त्यांचा विचार त्यांना करता आला असता, तर आदिवासी विकास विभागांची आणि शासनाचीच गरज कशाला पडली असती? परंतु हे कल्याणकारी राज्य आहे ना! मग रांगेच्या शेवटीदेखील नाही, तर बाहेर कुठेतरी उभ्या असलेल्या या शेवटच्या माणसाची जबाबदारी आपली आहे. विवेक पंडित या पुस्तकातून शासन यंत्रणेला या गोष्टीची जाणीव करून देत आहेत. कातकऱ्यांच्या बाबत फारशी शास्त्रशुद्ध माहिती उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत हे पुस्तक म्हणजे कातकरी प्रश्नावरचा मोलाचा दस्तऐवज आहे.









Reviews
There are no reviews yet.