Language: मराठी
Author: गंगाराम गवाणकर
Category: आत्मकथन
Publication: डिंपल पब्लिकेशन
Pages: 214
Weight: 303 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789392419713
‘व्हाया – वस्त्रहरण’ हे गवाणकरांचं आत्मकथन आहे आणि त्यात वस्त्रहरण नाटकामुळे लंडनच्या हवाई प्रवासातील धमाल किस्से आहेत. पण ‘गांजले ते गाजले’ या पुस्तकात गवाणकरांच्या अनेक प्रकाशित आणि अप्रकाशित जास्त नाटकांचे आत्मकथन आहे. या नाट्यप्रवासात त्यांना सहवास मिळालेल्या नाट्य-चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांचं कलावंत आणि ‘माणूस’ म्हणून गवसलेल्या अनुभवाचं जादुई दर्शन आहे. यात बॅक स्टेजपासून ‘स्टार’ पदापर्यंत पोहोचलेल्या रंगकर्मींची मोठी मालिका आहे. साहित्यसम्राट आचार्य अत्रे ‘मी कसा झालो’ या वाङ्मयीन आत्मशोधनात म्हणतात – ‘सज्जनांच्या दारी जाऊन मी जी माधुकरी मागितली, तीच माझ्या यशाचं भांडवल आहे’ ‘गांजले ते गाजले’तील घटना आणि प्रवास तर अंगावर काटे आणतात. ‘गांजले ते गाजले’मध्ये गवाणकरांना अनेक दिग्गजांच्या अनुभवांची माधुकरीची चव चाखता आली. म्हणून हे पुस्तक रुचकर झालं आहे.
– डॉ. अशोक भाईडकर







Reviews
There are no reviews yet.